छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
***सुधीर चव्हाण***
श्रीरामपूर(प्रतिनिधी)श्रीरामपूर येथे शिवस्वराज्य मंचच्या वतीने सरबताचे वाटप करून मूकबधिर विद्यालयात अन्नदान करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.सर्वधर्मीय नागरीकांचा सहभागाने राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन झाले.
यावेळी झालेल्या शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी सलमान पठाण,भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.उपस्थित सर्व धर्मीय बांधवांचा भगवे वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी झालेल्या शिवजयंती निमित्ताने सर्वधर्मीय बांधव एकत्रित आल्याने राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले असून छत्रपती शिवजी महाराज हे सर्वांचे श्रध्दास्थान व देशाची शान असल्याचे गौरवोदगार हनिफभाई पठाण यांनी यावेळी बोलतांना काढले.
या प्रसंगी सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित येत रयतेचा राजाला पुष्पांजली वाहून मानाचा मुजरा केला.यावेळी शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण,अब्दुल शेख, रमिज पोपटिया,युवा नेते विशाल मोजे,अविनाश भोसले, सोमनाथ घुगे,साईराम थोरात,सिकंदर तांबोळी,युसुफ शेख,लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,संदिप शेडगे, अविनाश झरेकर,सचिन मंडलिक, सागर चापानेरकर,लक्ष्मण वडीतके,युवराज पाटील,अमित कुकरेजा,हारूण तांबोळी आफान पठाण, कफील सिद्दिकी यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते