भक्ती ज्ञान वैराग्याच्या प्राप्तीसाठी जीवनात संत वाङमयाची पारायणे करा-भगवान महाराज जंगले शास्त्री
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील वैकुंठवाशी हभप रामकृष्ण काळे गुरुजींनी स्थापित केलेल्या श्री विठ्ठल रुख्मिणी अध्यात्मिक केंद्र संचलित “रामकृष्णाश्रमात”गाथा पारायण सोहळयाची तुकाराम बीजेला काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.संतांनी निर्माण केलेले ग्रंथ हे समाजाला मार्गदर्शक असून भक्ती ज्ञान वैराग्याच्या प्राप्तीसाठी जीवनात संत वाङमयाची पारायणे करा असे आवाहन आश्रमाचे प्रमुख महंत वेदमूर्ती हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलतांना हभप जंगले महाराज शास्त्री म्हणाले की परमार्थाचा वारसा संतांनी आपल्याला दिला आहे तो वारसा जतन करण्यासाठी व उत्साह-परपंरा कायम ठेवण्यासाठी वारकरी संप्रदायाने मोठे कार्य केले असल्याचे सांगितले
संत वाड्मय असलेले ज्ञानेश्वरी व गाथा सारखे ग्रंथांचे जीवनात पारायणे केल्याने मनुष्याला ज्ञान, वैराग्य, भक्तीची प्राप्ती होते,यामुळे प्रत्येक मनुष्याने जीवनात संतांनी निर्मित केलेल्या ग्रंथाचे वाचन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.सदर प्रसंगी त्यांनी जगदगुरू संत तुकोबारायांचे जीवन कार्य विविध दाखले देत विषद केले.
जगाच्या कल्याणासाठी संत हे भूतलावर जन्म घेतात व मानव जातीचा उद्धार करतात, संताचे विचार हे समाजाला दिशा देणारे असल्याने संत संगतीत राहून परमार्थ करा असा संदेश त्यांनी यावेळी बोलतांना दिला यावेळी जगदगुरू तुकोबारायांचा नामघोष करत काल्याच्या दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी संतसेवक भास्करराव राहूरकर व सौ संगीता भास्करराव राहुरकर यांच्या वतीने संतपूजन करण्यात आले.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या काला किर्तन प्रसंगी ह भ प मगर बाबा महाराज, ह भ प संतोष महाराज, ह भ प श्रीहरी महाराज वाकचौरे,ह भ प कानिफनाथ महाराज, ह भ प निलेश महाराज सुखद गुरुजींचे चे विद्यार्थी वृंद,सरपंच रावसाहेब दिघे,दादाभाऊ दिघेअनिल पाटील,मोरे साहेब , चेअरमन लोहकरे यांच्यासह पंचक्रोशीतील गोणेगाव, निंभारी, खुपटी, अंमळनेर, करजगाव, गोमळवाडी, पानेगाव, इमामपूर, वाटापूर, पाचेगाव, वांजुळपोई, तिळापूर, शिरेगाव, खेडले-परमानंद या गावातील भाविक-भक्त, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखंड हरिनाम सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री रामकृष्ण आश्रम भक्त मंडळ, भाविक भक्त,दाते, साधक, तरुण मंडळांनी विशेष योगदान दिले.