मिशन आरंभ इ 4थी आणि 7वी साठी
भेंडा – ( प्रतिनिधी ) मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांच्या मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गाच्या पूर्वतयारीसाठी इयत्ता चौथी आणि सातवीच्या वर्गाची दिनांक 16 मार्च रोजी सराव परीक्षा घेण्यात आली. नेवासा तालुक्यामध्ये एकूण चौथीचे 28 केंद्रावर परीक्षा केंद्रावर घेण्यात आली इयत्ता चौथीचे 5056 विद्यार्थी आणि इयत्ता सातवीचे 917 विद्यार्थी प्रविष्ट होते .
तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून ही सराव परीक्षा घेण्यात आली .या पूर्ण शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तिका देण्यात आल्या वार्षिक नियोजन शिक्षकांना देण्यात आले .त्याआधारे
ज्यादा तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आणि त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवीच्या धर्तीवर मुख्य परीक्षा सारखी घेण्यात आली .
या परीक्षेमुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले .विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची भीती कमी होईल आवड निर्माण होईल अशा पालक वर्गातून प्रतिक्रिया आल्या. शिक्षकांनाही आपल्या वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य जिल्हा गुणवत्ता यादीत येण्यासाठी विद्यार्थ्यांचा स्तर समजेल तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतील अशी अपेक्षा आहे. या परीक्षेचे संपूर्ण नियोजन शिक्षणाधिकारी पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे केल्याचे दिसून आले .
चौकट
गुणवत्ता वाढीसाठी इयत्ता चौथी आणि सातवीची परीक्षा मिशन आरंभ म्हणून घेणे हा जिल्हा परिषदेचा कौतुकास्पद उपक्रम आहे पालक शिक्षक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे .
शिवाजी कराड
गटशिक्षणाधिकारी नेवासा