8 C
New York
Wednesday, December 10, 2025

Buy now

spot_img

नेवासा पंचक्रोशी पायी दिंडीचे गोणेगाव रामकृष्ण आश्रमात उत्स्फूर्त स्वागत,शेकडो भाविकांनी घेतले दर्शन

नेवासा पंचक्रोशी पायी दिंडीचे गोणेगाव रामकृष्ण आश्रमात उत्स्फूर्त स्वागत

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी हभप रामेश्वर महाराज कंठाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पंचक्रोशी पायी दिंडीचे नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुख्मिणी अध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्ण आश्रमामध्ये मंगळवारी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
नेवासा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत सदरची दिंडी गोणेगाव चौफुला येथील श्री रामकृष्ण आश्रमात आली असता या पंचक्रोशी दिंडीचे पंचक्रोशीतील भाविकांनी पूजन करून दर्शन घेतले.सदर दिंडीच्या स्वागत प्रसंगी आळंदी येथील हभप सीताराम बाबा मगर,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के शास्त्री, रामकृष्ण आश्रमाचे महंत हभप भगवान महाराज जंगले शास्त्री,रामगड संस्थानचे महंत बाळकृष्ण महाराज दिघे, हरि महाराज वाकचौरे,दिंडी चालक हभप रामेश्वर महाराज कंठाळे,नामदेव महाराज कंक,शेषराव जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के,बाळकृष्ण
महाराज दिघे,भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते सजविण्यात आलेल्या पालखीतील माऊलींच्या प्राकृत पादुकांचे पूजन करून आरती करण्यात आली.उपस्थित संत महंतांचे संतपूजन भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचक्रोशी दिंडीचे महत्व हभप देविदास महाराज म्हस्के यांनी विषद केले
रामकृष्ण आश्रम भक्त मंडळाच्या वतीने दिंडीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रचनेच्या वेळी तीर्थक्षेत्र नेवासा या भूमीबद्दल “त्रिभुवनैक पवित्र,अनादी  पंचक्रोश क्षेत्र,जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे” असे वर्णन केलेले होते याच ओवीचा आधार घेत ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर निर्माते ब्रम्हलिन वैकुंठवाशी हभप श्री बन्सी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने तसेच संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, देवगड संस्थान व भक्त परिवारातर्फे पंचक्रोशी दिंडी प्रदक्षिणा सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशी पायी दिंडी सोहळयात दररोज काकडा, भजन, गौळण, प्रवचन व मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन असे कार्यक्रम होत आहे.रांजणगाव, वाटापूर,गोणेगाव सुरेगाव, प्रवरासंगम, भेंडे या मार्गे सदरची दिंडी नेवासा येथे मुक्कामी येणार आहे. शनिवार दि.८ मार्च रोजी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “पैस”खांब मंदिरात काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप करून दिंडी सोहळयाची सांगता होणार आहे.

फोटो ओळी-नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथे पंचक्रोशी पायी दिंडीच्या आगमन प्रसंगी संतपूजन करतांना हभप भगवान महाराज जंगले शास्त्री समवेत हभप देविदासजी महाराज म्हस्के,बाळकृष्ण महाराज दिघे,मगर बाबा,दिंडी चालक हभप रामेश्वर महाराज कंठाळे व उपस्थित भाविक दिसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या