सिद्धेश्वर बहूउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम….
नेवासा(प्रतिनिधी)महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्त नेवासा तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथील श्री सिद्धेश्वर बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना केळी खिचडी व पाणी बॉटलचे वाटप संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
ब्रम्हलिन १००८ श्री बालब्रम्हचारी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली असून धर्मदाय आयुक्तांनी संस्थेस मंजुरीचे नोंदणी पत्र दिले आहे.संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या गेट समोर केळी,शाबुदाना खिचडी,वेफर्स,पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ श्री सिद्धेश्वर बहूउद्देशीय संस्थेचे मार्गदर्शक विश्वस्त पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी श्री सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी रखरखत्या उन्हात आलेल्या भाविकांनी पाणी बॉटल व उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आल्याने शेकडो भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.केळी फराळ वाटप करतांना “श्री सिद्धेश्वर भगवान की जय”
ब्रम्हलिन १००८ श्री बालब्रम्हचारी महाराज की जय असा जयघोष यावेळी करण्यात आला.
मोफत केळी,खिचडी पाणी बॉटल वेफर्स वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे,विश्वस्त मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,सुभाष पाटील दिघे,संतोष फिरोदिया,वसंतराव डावखर,सुधीर चव्हाण, कडूबाळ रासने,महेश मते,भगवानराव कोरडे,भारत गवळी,जळके खुर्दचे सरपंच कैलासभाऊ झगरे
हॉलीबॉलपटू इकबालभाई शेख उपस्थित होते
फोटो ओळी-नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने केळी पाणी बॉटल वेफर्सचे मोफत वाटप करतांना संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे, पत्रकार सुधीर चव्हाण, हॉलीबॉलपटू इकबाल भाई शेख,श्री कणसे महाराज दिसत आहे(छाया-आदित्य चव्हाण नेवासा)