18.3 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

तालुक्यात मला निवडून येण्यासाठी केलेले नवस हेच माझ्यासाठी प्रेम आहे – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील

देडगांवात आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांची पेढेतुला

नेवासा (प्रतिनिधी) – बालाजी देडगांव (ता.नेवासा) येथे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा बुधवार (दि.२६) रोजी आभार दौरा व महाशिवराञोत्सवानिमित्त महादेव मंदिर व बालाजी मंदिर येथे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी दर्शन घेतले व गावकऱ्यांचे आभार मानले यावेळी येथील बळीराजा संघटनेचे अध्यक्ष युवानेते मच्छिंद्र मुंगसे व निलेश कोकरे यांच्यावतीने गावात आमदार लंघे – पाटील यांची पेढेतुला करण्यात आली देडगांव येथे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचे गावकऱ्यांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.सुखदेव महाराज मुंगसे,सरपंच चंद्रकांत मुंगसे,उपसरपंच बाळासाहेब मुंगसे,सोसायटी चेअरमन बाबासाहेब मुंगसे पाचुंद्याचे सरपंच कारभारी टकले, शिवाजी थोरात,नवनाथ साळुंके,आदिनाथ थोरे,आदिनाथ माने,आदिनाथ ठोंबरे,आकाश चेडे यांच्यासह भाविक – भक्त आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत मला सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले असून सर्वसामान्य जनतेने ठरवले तर काय पण होवू शकते? हे विधानसभा निवडणूकीत जनतेने मला मतदान करुन दाखवून दिलेले आहे या तालुक्यातील जनतेसाठी आपण २४ तास उपलब्ध असून जनतेच्या कामासाठी सदैव तप्तर राहणार आहोत देडगांव येथे आज माझी पेढेतुला केलेली असून मला निवडून येण्यासाठी तालुक्यातील जनतेने नवस केलेले होते हेच माझ्यावर जनतेचे प्रेम असून त्यांच्या प्रेमात आपण कधीही अंतर पडू देणार नसल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या