दै.नगरशाही नेवासा (प्रतिनिधी) – जिल्हा न्यायालयाच्या नुतन इमारतीसाठी ५१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकिय मान्यता देण्यात आल्याची माहीती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी प्रस्तृत’शी बोलतांना दिली.
नेवासा न्यायालयाची सध्या असलेली ही इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असून या
इमारतीमध्ये दोन जिल्हा न्यायाधिश,दोन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश तसेच चार कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश या इमारतीमध्ये कामकाज करीत असतांना सदर इमारत ही न्यायालयीन कामासाठी अपुरी पडत असल्यामुळे काम करण्यासाठी पक्षकार व वकिलांची तसेच न्यायालयाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती व त्यासाठी नविन जिल्हा न्यायालयाची इमारत होणे अत्यंत आवश्यक बाब बनलेली होती या बाबींचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी लक्ष घालूून जिल्हा न्यायालयाच्या नुतन इमारतीसाठी ५१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकिय मान्यता देण्यात यशस्वी कामगिरी केल्यामुळे वकील बांधवातून आमदार लंघे – पाटील यांचे कौतुक केले जात आहे.
नेवासा येथे जिल्हा न्यायालयाची स्थापना झाल्यापासुन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी वकिल संघाचे नेहमीच पाठपुरावा चालु होता तसेच सदर नविन
इमारतीसाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर बांधकामासाठी निधी आवश्यक असल्याने त्यासाठी नेवासा वकिल संघाने वेळोवेळी प्रशासकिय पातळीवर प्रयत्न
केलेले होते सदर निधी उपलब्ध व्हावा म्हणून नेवासा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.कल्याणराव पिसाळ व कार्यकारणीने त्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा
केलेला आहे सदर कामासाठी वकिल संघाने वेळोवेळी मुंबई व नागपुर येथे जावुन इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केलेली होती.
या न्यायालयीन इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन मंत्रलयातील उच्चस्तरीय कमिटीची तातडीची बैठक बोलावून नेवासा न्यायालयाचे इमारतीसाठी ५१ कोटी २३ लाख रुपयाच्या खर्चास
प्रशासकिय मान्यता मिळवुन दिली आहे व त्यामुळे इमारतीचे बांधकाम सुरु होण्यासाठी आता मुख्य अडथळा दूर झालेला आहे.
या इमारतीच्या कामाचा पाठपुरावा नेवासा वकिल संघ व पालक न्यायमुर्ती कंकनवाडी,न्यायमुर्ती चपळगांवकर, जिल्हा न्यायाधिश यलगड्डा व जिल्हा न्यायाधिश शेंडे व विधी व बांधकाम विभागातील सर्व सचिव यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले सदर निधीस प्रशासकिय मंजुरी
मिळाल्याबद्दल नेवासा वकिल संघामध्ये व पक्षकारामध्ये समाधानाचे वातावरण असून वकिल संघाने नामदार राधाकृष्ण विखे – पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे –
पाटील याचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.