ज्ञानेश्वर जमदाडे विजेता
दै.नगरशाही नेवासे शहर ता.२४
– नेवासे येथे श्री मोहिनीराजांच्या यात्रा निमित्ताने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कुस्त्यांच्या जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. बालकांसह मुलींच्या कुस्त्या या हगाम्याचे आकर्षण ठरले. कुस्ती हगाम्याचे उद्घाटन साहेबराव घाडगेपाटील व उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व मल्लांनी यावेळी उत्कृष्ट पकडीचे प्रदर्शन घडवले. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये भारत केसरी ज्ञानेश्वर जमदाडे याने पंजाब केसरी मनप्रीत सिंग याला बँक थ्रो डावावर चितपट केले. कुस्त्यांच्या हगाम्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३०० पेक्षा जास्त पैलवान होते. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कुस्त्या बघण्याचा योग नेवासकर व पंचकोशीतील प्रेक्षकांना मिळाला. दोन नंबरच्या कुस्तीमध्ये नाशिकच्या बाळू
बोडके याने अनिल कोकणे यांना ठाक डावावर चितपट केले. तीन नंबरच्या कुस्तीमध्ये संभाजीराजे कुस्ती केंद्र नगरचा पैलवान युवराज चव्हाण याने गंगावेश च्या प्रणित भोसले याला चितपट केले. याचबरोबर इतर शंभरहून अधिक कुस्ती मैदानामध्ये जोडल्या होत्या.
यांनी पहिले पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. संभाजी निकाळजे, श्री.सुरेश लव्हाटे, पसंदीप कर्डिले, महादेव काकडे यांनी काम पहिले
या सर्व मल्लांना त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष साहेबराव घाडगेपाटील, संभाजी पवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
चौकट–
यांनी घेतले अथक परिश्रम.
यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य ,धनुभाऊ काळे, राजेंद्र काळे, नंदकुमार पाटील, अनिल शिंदे, जयंत मापारी, आकाश एरंडे, दीपक धोत्रे, राजेंद्र मापारी, जालिंदर गवळी, जयदीप जामदार, सौरभ मुनोत, दिनेश व्यवहारे, विकी खराडकर यांनी परीश्रम घेतले.
चौकट —
तालुक्यातील व शहरातील युवकांचा कुस्ती कड़े कल वाढवा माउलीच्या पूण्य भूमीतुन भावी महाराष्ट्र केसरी निर्माण होईल याच हेतुने यात्रा उत्सवा दरम्यान या भवयदिव्य कुस्ती हंगाम्याचे आयोजन करण्यात आले
धनु काळे.
कुस्ती प्रेमी.
चौकट–
राज्यभरातून व जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या उत्कृष्ट राज्यपातळीवरील मल्लांच्या कुस्त्या पहिल्यांदाच गावात झाल्याने तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली. पुढील वर्षी देखील भवयदिव्य कुसत्या भरु.
राजेंद्र काळे,
कुस्ती प्रेमी.