दै.नगरशाही
कुकाणा प्रतिनिधी : रहिवासी जागेचे प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर घरकुलाच्या भूमिहिन लाभार्थीना ते कच्च्या घरात राहत असलेल्या जागा नियमानुकूल करून घरकुल बांधकामास परवानगी द्यावी असा ठराव चिलेखनवाडी ग्रामपंचायतने संमत केला असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी दिली.
चिलेखनवाडी ता.नेवासा ग्रामपंचायत लोकसंख्येच्या प्रमाणात घरकुल मंजूरीत तालुक्यात अव्वल ठरली असून जागे अभावी घरकुलाचे बांधकाम कुठे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे..
सध्या गट नं . १७७ क्षेत्र १ .१७ गुरे उभी करण्यासाठी व गट नं. १७८ क्षेत्र o .९१ खळीवाडग्या करिता या दोन्ही गट शासकीय नोंदी प्रमाणे भोगवटादार ग्रामपंचायत आहे . या जागेवर आजपर्यंत अनेक लाभार्थींनी इंदिरा आवास योजना , रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेतून अनेक घरांचे बांधकाम केले आहे . तसेच शासकीय योजनेतून रस्ते , बदिस्त गटारी , सभामंडप इत्यादी विकास कामे झाली आहेत . परंतु पंचायत समिती स्तरावरून सदर जागेवर सध्या पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतून घरकुले मंजूर झालेल्या भूमिहीन लाभार्थीनां बांधकाम करण्यात परवानगी नाकारण्यात आली आहे .पतंप्रधान आवास अंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वितरण करण्यासाठी दि .२२ फेब्रुवारी शनिवार रोजी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सविता गोसावी यांचे उपस्थितीत आयोजित ग्रामसभेत वरील ठराव सर्वांनुमते संमंत करण्यात आला .
ग्रामसभेत सरपंच भाऊसाहेब सावंत उपसरपंच नाथा गुंजाळ , निवृत्त मंडल अधिकारी रमेश सावंत , सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब रा. सावंत ,प्रा शाळा मुख्याध्यापक सुरेश सानप , सूर्यकांत पाडळे , प्रभाकर खंडागळे , राम पवार , गोपाल भातंबरे , कैलास काळे , असाराम भोसले , शेषराव भातंबरे , इम्रान शेख , सुशिल कांबळे , लक्ष्मण वाघमोडे , रवि कांबळे , मधुकर काटे , नवनाथ लोंखडे , भाऊसाहेब सरोदे , गोरक्ष गुंजाळ यांनी चर्चेत भाग घेतला . यावेळी ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ८६ लाभार्थींना मंजूर पत्राचे वितरण करण्यात आले . ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . –