घरकुल लाभार्थ्यांना पहील्या टप्प्याचे अनुदान वितरण – आमदार विठ्ठलराव लंघे –
नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा पंचायत समिती कार्यालयात आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील तालुक्यातील ५६९२ घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.२२)
फेब्रुवारी रोजी दुरदृष्यप्रणालीव्दारे हा कार्यक्रम संपन्न झालेला असतांना नेवासा पंचायत पंचायत समिती कार्यालयामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, शिवसेना विधानसभा प्रमुख श्री भाऊसाहेब वाघ,भाजप शहराध्यक्ष श्री मनोज पारखे, श्री शिवाजी लष्करे घरकुल विभागाचे अधिकारी आणि विविध शाखेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील एकुण घरकुल लाभार्थी उदिष्ठ ७२४० असतांना एकुण ७०५० घरकुलांना मंजुरी मिळालेली असून पहिल्या टप्प्यातील ५६९२ घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात आल्याची माहीती झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिताच्यावतीने यावेळी देण्यात आली.
यावेळी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टी कोनातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये तालुक्यातील ५६९२ घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आलेला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तालुक्यातीलच काय? तर देशातील गोरगरीब मानसाला सुद्धा हक्काचा निवारा देण्याचा स्त्युत्य उपक्रम पंतप्रधामंञि मोदी यांच्या संकल्पनेतून मिळालेला असून नेवासा तालुक्यातील कुटूंबांना प्रधानमंञी घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला असून आणखी लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून सर्वांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासन यंञणा दप्तर झालेली आहे कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नसून तळागाळातील सामान्य गोरगरीब सामान्य जनतेला लाभ मिळण्याच्या सुचना पंचायत समितीला दिल्याचे यावेळी आमदार लंघे – पाटील यांनी यावेळी ही माहीती दिली.