भेंडा बुद्रुकची विशेष ग्रामसभा संपन्न…
भेंडा(वार्ताहर):— नेवासा तालुक्यातील
भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत नेवासा-शेवगाव रस्त्यावरील दुतर्फा व्यवसायीकांचे अतिक्रमणे व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमीत करावे हे दोन विषय मंजूर करण्यात आले.
भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा नामदेव निकम यांच्या अध्यक्षतेखाली
मंगळवार दि.१८ रोजी सकाळी १० वाजाता बस स्थानक परिसरात संपन्न झाली. संपुर्ण बाजारपेठ बंद ठेऊन व्यापारी व ग्रामस्थ ग्रामसभेस उपस्थित होते.या सभेत महा मार्गावरील अतिक्रमण काढतांना अंतरात सूट देऊन १५ ऐवजी १० फूट करावे, गायरान जमिनीवरील रहिवास्यांचे अगोदर पुनर्वसन करा मगच अतिक्रमण काढावे अशा मागणीचे ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे, नामदेव निकम, दत्तात्रय काळे, बापूसाहेब नजन, गणेश गव्हाणे, आबासाहेब काळे,अड.रवींद्र गव्हाणे, विनायक मिसाळ, किशोर मिसाळ, वाल्मिक लिंगायत, कॉ.भारत आरगडे, अभिजित पोटे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गोर्डे, रामदास वाघमारे, देवेंद्र काळे, , राजेंद्र चिंधे, अमोल जोगदंड, अवधूत लोहकरे, यडूभाऊ सोनवणे,रामदास राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब गव्हाणे,
ग्रामविकास अधिकारी विष्णू भिसे,
डॉ.शिवाजी शिंदे, बाबासाहेब पटारे,शरद गव्हाणे, प्रमोद यव्हांङे, संतोष फुलारी,शरद भालेराव, संदीप फुलारी, किसन यादव, वामन औटी, ज्ञानेश्वर गोरे, अशोक साळवे,
कापसे आकाश,सुभाष खेडकर,अफजल पटेल, विलास बनसोडे यांचेसह ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.सुनील गव्हाणे यांनी आभार मानले.