बन्सी महाराज तांबे विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.
रांजणगाव प्रतिनिधी: 19 फेब्रुवारी 2025 रोजी वै.ह .भ .प . बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालय रांजणगाव देवी. या विद्यालयामध्ये आज शिवजयंती साजरी करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिवरायांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. जि.प.प्रा शाळेतील छोटा शिवभवत सार्थक मच्छिंद्र नजन याने छत्रपतींचे स्वराज्या विषयीचे धोरणे प्रजेविषयी प्रेम आपल्या छोटे खाणी भाषणात व्यक्त केल्या तसेच काही माजी विद्यार्थी यांनीही शिवजयंतीला उपस्थिती उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रगतशील शेतकरी श्री.शरद वाकचौरे पाहुणे म्हणून लाभलेले. रामभाऊ चौधरी,बाळासाहेब वाकचौरे, महेश गवळी ,योगेश मतकर ,आदि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.इयत्ता नववीच्या मुली यांनी लेझीम पथकावर शिवरायांना मानाचा मुजरा केला. इतरही संस्कृती कार्यक्रम या ठिकाणी पार पडले आपल्या मनोगतमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब पंडित सर यांनी शिवाजी महाराजांची गाथा किती महत्त्वाची आहे ते विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला, आणि भविष्यासाठी शिवरायांचे विचार किती मोलाचे आहेत हे स्पष्ट केले. अध्यक्ष भाषणामध्ये शरद वाकचौरे यांनी गावातील विद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले अतिशय माळरांवर असलेले ही विद्यालय प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळवते, त्याबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप श्री.अकोलकर सर यांनी आपल्या ऐतिहासिक प्रसंगातून केले व आलेल्या विद्यालयाचे पाहुण्यांचे विद्यालयाचे वतीने आभार मानण्यात आले.