29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

चक्क नदीवरील पुलच झाला गायब.. लोहोगाव ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक.

प्रत्यक्षात पुल न बांधताच लाटले लाखो रुपयांचे बिल.
ज्या दुकानात विद्यूत मोटारींच मिळत नाही त्या दुकानातून दाखवली मोटारींची लाखोंची खरेदी..

सोनई प्रतिनिधी.:
लोहोगाव ता नेवासा येथील ग्रामसभा गेल्या काही वर्षांपासून घेतली जात नव्हती व ग्रामपंचायत सदस्य यांचीही मासिक मीटिंग
घेतली जात नव्हती ही बाब लोहोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश कल्हापुरे व इतर सुज्ञ नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने पाठपुरावा केल्याने 26 जानेवरीची ग्रामसभा
सोम दि 17 फेब्रु रोजी लोहोगाव ग्रामसभा शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली
या सभेत सन 2022 ते 2023 व सन 2023 ते 24 या कालावधीत तत्कालीन सरपंच व विद्यमान सरपंच
यांनी लोहोगाव ता नेवासा येथे
पाटोळे वस्ती लगत गट न 194 मध्ये एक पूल बांधकाम केल्याचे दाखवले परंतु व प्रत्यक्षात पुलाचे काम न करता 1 लाख 44 हजार रुपयांचे बिल काढले तसेच
दोस्ती इलेक्ट्रॉनिक च्या नावाने मोटार दुरुस्ती मटेरियल तसेच मोटारखरेदी कामी व इले मोटार दुरुस्तीसाठी
लाखो रुपयांचे बिल काढले.

तसेच जाणीवपूर्वक काही व्यक्तीच्या नावे सदर व्यक्तींचा त्या बिलाशी काहीही संबंध नसतांना विविध मार्गाने पॅसें काढले आहेत ते प्रत्यक्षात कुठल्या कामासाठी वापरले याचा कुठलाही हिशेब दिसत नाही

ज्या दुकानाच्या नावे मोटार खरेदीचे बिल काढले त्या दुकानात इले मोटारच मिळत नाही तसेच 15 वित्त आयोगाचे कामे नियमबाह्य पध्दतीने देऊन कमी रकमेच्या निविदा नाकारून व जाणीवपूर्वक वाढीव
दराने देण्यात आलेली कामे यासह विविध प्रश्नांवर लोहोगावच्या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली
सुरेश कल्हापुरे व ग्रामस्थ यांनी विविध प्रश्न विचारताच ग्रामपंचायत कारभारात इतर सदस्य यांना विश्वासात न घेता काम करणारे
सरपंचपती यांची उत्तरे देतांना धांदल उडाली लवकरात
लवकर झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लोहोगाव ग्रामस्थांनी एकमुखाने केली
चित्रपटात विहिरी चोरीला गेल्याचे पाहिले परंतु भर पावसाळ्यात ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुलाचेच बिल
काम करता काढल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी चर्चेत सुरेश कल्हापुरे,दत्तात्रय
सौ शारदाबाई शिरसाठ,सनी शिरसाठ,प्रमोद घुले, यांनी चर्चेत सहभाग घेतला
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी म्हतारदेव ढेरे हे होते
चौकट…1
प्रत्यक्षात कामे न करता
लाखो रुपयांची बिले काढण्यात आलेली असून गावचे पॅसें लाटनारे यांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी
सुरेश कल्हापुरे
ग्रामस्थ लोहोगाव.
चौकट..2
पुलच गेला चोरीला.
प्रत्यक्षात पुलाचे काम दलित वस्तीत न करता
पुलाचे काढलेले पॅसें ऑनलाइन प्रणाली असतांना कुठल्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात कसा आला नाही
माझ्या वस्ती लगत
पुलाचे बांधकाम केल्याचे बिल
काढून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे
दोषींवर तातडीने कारवाई करून गावचे भ्रष्टाचार केलेले पॅसें तातडीने भरून घेण्यात यावेत
संतोष पाटोळे
ग्रामस्थ..3
ग्रामस्थांनी केलेल्या आरोपात सत्यता दिसून येत आहे ग्रामसभेत
झालेल्या आरोपांची
तातडीने अधिकारी स्तरावरून चौकशी करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हापरिषदकडे मागणी करणार आहे जो दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे.
निसार सय्यद
उपसरपंच लोहोगाव

चौकट..

फोटोओळी..
लोहोगाव ग्रामसभेत
विविध प्रश्नांवर बोलतांना ग्रामस्थ
व नदीवरील गट नं 194 मध्ये
पुलाचे बिल काढले त्या जागेवर पुलच नसल्याचे दाखवतांना ग्रामस्थ

Related Articles

ताज्या बातम्या