नेवासा(प्रतिनिधी)मुलगी पहायला गेले आणि लग्न लावून आले…ही लोप पावलेली परंपरा आज ही जोपासण्याचा प्रयत्न नेवासा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाकचौरे यांनी आपल्या मुलाचा विवाह साखरपुडयात लावून केला आहे.वाकचौरे पाटील व थोरात पाटील यांच्या या परिवाराच्या “झट मंगणी पट ब्याह”या प्रमाणे पार पडलेल्या आदर्शवत विवाह सोहळयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेवासा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य दिलीपराव विठ्ठलराव वाकचौरे यांचे चिरंजीव युवराज हे आपल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शेवगाव तालुक्यातील घोटण खानापूर या ठिकाणी थोरात पाटील यांची कन्या चि .सौ.का.श्रुतूजा हिस पहाण्यासाठी गेले होते मुलामुलींची पसंदी झाल्यानंतर साखरपुडा ठरला
साखरपुड्याच्या मुहूर्तावरच विवाह उरकून सल्ला काही नातेवाईक मित्र परिवाराने दिला त्यासाठी आग्रह धरला.
मनमिळाऊ स्वभावाचे असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाकचौरे यांनी नातेवाईकांशी सल्लामसलत केली यासाठी नातेवाईकांनी सहमती दर्शवली
त्यानुसार लगेचच पुढची तयारी करण्यात येऊन साखरपुडयात विवाह लावण्याचा आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला.यावेळी झालेल्या आदर्श विवाह सोहळयासाठी विठ्ठलराव वाकचौरे,निवृत्ती मारकळी, विलास वाकचौरे,चंद्रकांत वाकचौरे,अनिल मारकळी, रामकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन दीपक चौधरी,माऊली कार्ले,गोरख तनपुरे,ज्ञानेश्वर मारकळी,रविंद्र मारकळी, सचिन मारकळी,बाळासाहेब मारकळी,किरण यादव, अमित काळे,राजेंद्र वरुडे,पुनतगावचे सरपंच सुदर्शन वाकचौरे,अरुण वाकचौरे,डॉ नंदकुमार गंधारे,भारत गंधारे,गोरखभाऊ घुले,दादासाहेब मैराळ,अजित हारदे,संदीप हारदे यांनी पुढाकार घेतला.
या आदर्श विवाहातून बचत झालेली रक्कम ही पुनतगाव येथील बांधण्यात येत असलेल्या गणेश मंदिर बांधकामाला देणगी देण्याचा निर्णय ठरला या आदर्शवत विवाह सोहळयाचे सर्वत्र कौतुक होत असून वाकचौरे पाटील व थोरात पाटील परिवाराचे देखील समाजातून अभिनंदन होत आहे