तेलकूडगाव
प्रतिनिधी: समीर शेख
नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी आद.विश्वस्त अण्णा पाटील घाडगे होते.
याप्रसंगी शिवव्याख्याते हभप.माऊली महाराज मोरे ब्राम्हणीकर यांचे व्याख्यान झाले.
या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख आद.मच्छिंद्र म्हस्के पाटील,सरपंच सतीशराव काळे पाटील,चेअरमन शिवाजी घोडेचोर पाटील, व्हा.चेअरमन हरिश्चंद्र काळे पाटील, ज्येष्ठ मुरलीधर अप्पा काळे पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव दादा काळे पाटील, माजी चेअरमन अरुण पाटील घाडगे,ग्रा. पं.सदस्य नामदेव अण्णा घोडेचोर पाटील, माजी व्हा.चेअरमन म्हातारदेव काळे पाटील,संचालक अशोक काळे सर,युवानेते महेशराजे काळे पाटील,माजी सरपंच बालकनाथ काळे पाटील, माजी चेअरमन ज्ञानेश्वर काळे पाटील,उपसरपंच शरद काळे पाटील, कानिफनाथ घोडेचोर पाटील, बबन भगत पाटील,कोमल ताई भेंडेकर,कासार भाऊजी,फटांगरे पाटील,दत्तात्रय वांढेकर सर,मा.प्रशासक मनिषा राऊत मॅडम,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे सर व ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कु.ताके यशश्री हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा तर चि.गुरूराज काळे याने बाल-शिवबा यांची वेशभूषा केली होती. याशिवाय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मराठमोळा पोशाख करून हाती भगवे झेंडे घेऊन हर हर महादेव,जय भवानी -जय शिवाजी च्या घोषणा देत शोभायात्रेत सहभागी झाले होते.यावेळी विद्यालयातील काळे कार्तिकी, घोडेचोर प्रणाली, स्वरा काळे, ओवी भागवत ,भक्ती भागवत, श्रुती घोडेचोर श्रद्धा शिरसागर, माधुरी काळे, सिद्धी फटांगरे, पूर्वी उडदंगे, भाग्यश्री भागवत, ईश्वरी जाधव,येवले श्रेया आदिंनी हिंदवी स्वराज्य संस्थापक तथा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द-सुमनांनी आपल्या मनोगत व पोवाड्यातून विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक गणेश मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिवगीतांवर उत्कृष्ट नृत्याविष्कार करणारे लेझिम पथक तयार केले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब बांदल व गणेश काळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेलकूडगाव संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर आभार प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे सर यांनी मानले.