18.3 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

पानेगांवात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात

पानेगांव (वार्ताहर):- नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा
अश्वारूढ पुतळा समोरील आकर्षक रांगोळी विविध फुलांची सजावट करण्यात आली. शिवस्मारक सोहळा समितीच्या सदस्यांनी आठवडा भरा पासून जय्यत तयारी सुरू केली सकाळी ९ वाजता तोफांचा, फटाक्यांचा आताषबाजीने शिवमय वातावरणात श्री रामकृष्ण आश्रम गोणेगांव महंत हभप भगवान महाराज शास्त्री व शेतकरी निवृत्ती पांडुरंग बारवकर यांच्या हस्ते पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव विद्यार्थ्यांनी झांज, लेझीम पथक तयार करुन शिवकालीन दृश्य सादरीकरण करण्यात आले. पोवाडा गायनाने शिवमय वातावरण निर्माण झाले.
चार वर्षांपूर्वी माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या मागदर्शनाखाली जिल्हा परिषद माजी सभापती लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच शिवस्मारक सुशोभीकरण करण्यात आले दिवसभर परीसरातुन, तालुका भरातुन शिवभक्त दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पारंपरिक वाद्ये, फटाक्यांचा आताषबाजीने छत्रपतींचा वेशभूषेत गावात मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं सांगितलं.

शिवस्मारक सोहळा समितीचे महेश जंगले, लक्ष्मीकांत जंगले, संकेत गुडधे, गणेश कापसे, सूरज जंगले सुजित नवगिरे ,विशाल जंगले, हितेश जंगले,डॉ. सुरज जंगले, शंकर जंगले, मयूर जंगले, बाबाराजे गुडधे, किरण जंगले, नयन जंगले हरीश जंगले, राजेंद्र जंगले, आकाश जंगले, बाबासाहेब शेंडगे, विजय वाघुले, संदिप जंगले,दिपक जंगले, गणेश गायकवाड, अॅड किरण जंगले,पोलीस पाटील बाबासाहेब जंगले आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या