18.3 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या हस्ते बटन दाबून मुळाचे आवर्तन सोडले…

 

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश!

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून आमदार लंघे – पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक

नेवासा (प्रतिनिधी) – मुळा उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी वारंवार केल्यामुळे आ.लंघे – पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्तेच सोमवार (दि.१७) रोजी सांयकाळी पाच वाजता मुळा उजव्या कालव्यातून आमदार लंघे – पाटील यांनी प्रत्यक्षात बटन दाबून पाणी सोडले यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,राहुरी उपअभियंता विलास पाटील,उपअभियंता संदीप पवार,उपअभियंता अक्षय कराळे यांच्यासह मुळा पाटबंधारे विभागाचे सर्व शाखा अभियंता उपस्थितीत होते.

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला वरदान ठरणारे हे आवर्तन आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रत्यक्षात त्यांच्याच हस्ते सोडण्यात आल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे आहे.


वाढत्या उन्हाळ्याच्या कडाख्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न नेवासा तालुक्यात मोठी गंभीर बाब बनलेली होती शेतकऱ्यांची उभी पिके शेतातील बोअरवेल गुळण्यावर आल्यामुळे कोमाजून चाललेली होती त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्याकडे केलेली होती त्यामुळे आमदार लंघे – पाटील यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंञी तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे केली होती .

आ.लंघे यांच्या मागणीमुळे पालकमंञी विखे – पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी चर्चा करुन उन्हाळ्याची तिव्रता लक्षात घेत शेतकऱ्यांच्या पिकांसाठी व जनावरांना पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता तालुक्यातील अनके गावात शेतीतील पाणी आटल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता त्यामुळे मुळा धरणातून आवर्तन सोडण्याची एकमुखी मागणी आणि सतत पाठपुरावा आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंञी तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे केला होता त्यामुळे पालकमंञी विखे – पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तन सोडण्याबाबत सूचना केलेली होती व तसे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहीती आमदार लंघे – पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.

मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मुळा उजव्या कालव्यातून अखेर सोमवारी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळणार असून तालुक्यातील नागरीकांचा पाटाला आलेल्या पाण्यामुळे गुळण्यावर आलेले बोअरवेल सुरु होवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार असल्यामुळे या आवर्तनाचा मोठा आधार मिळणार असल्यामुळे आमदार लंघे – पाटील यांच्या कामगिरीचे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून मोठे कौतुक केले जात आहेत.

चौकट
राज्याचे जलसंपदा तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेवून मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना देवून सोमवारी प्रत्यक्षात आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी मुळा उजव्या कालव्याचे बटन दाबून आवर्तन सोडले आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्यासह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून पालकमंञी विखे – पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या