.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :
सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालय गोगलगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांचे पिताश्री ह.भ. प. दिनकर महाराज मते यांनी विद्यार्थ्यास आयुष्यात संगत फार महत्त्वाची असते, दुर्जनाची संगत केल्यास जीवन वाहत जाते. संगत चांगली ठेवा, जीवनात शिक्षण महत्त्वाचे आहे.
ज्ञानाने जीवन सफल बनते, विद्यार्थी व गुरु यांचे नाते अनमोल असते. आयुष्यात आई वडिलांना कधी विसरू नका. आजच्या विज्ञान युगात नवीन नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अभ्यास करावा व चांगली संगत, चांगला अभ्यास करून आपले जीवनाचे उद्दिष्ट यशस्वी करावे असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव गोविंद शेळके होते. याप्रसंगी श्री शेळके यांनी विद्यालयास दहा फोटो फ्रेम सप्रेम भेट दिले. त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापक श्री घुले नानासाहेब., वर्गशिक्षक काळे दत्तात्रय, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मोहन घावटे यांनी विद्यार्थ्यास परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपले विद्यालयाशी असलेले ऋणानुबंध,भावना, आपल्या शब्दात व्यक्त केल्या .
यावेळी पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.