दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी/परविन शेख : शेवगाव पंचायत समिती उमेद च्या माध्यमातून सुयश समूहाला व आदिशक्ती समूहाला 15 लाख 72,000 कर्ज वितरण शेवगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांच्या अध्यक्षतेखाली धनादेशाचे वाटप करण्यात आले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीने गाव स्तरावर छोटे गाव भगुर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे., उमेद च्या माध्यमातून गरीब गरजवंत एकल विधवा महिलांचे समूह स्थापन करण्यात येते . खेळते भांडवल फिरता निधी 30 हजार रुपये दिले जाते. आणि गट गुंतवणूक निधी cif 60 हजार रुपये दिले जाते आणि त्यांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी बँक कर्ज च्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम केले जाते. उमेद अभियाना अंतर्गत शनिवार दि. .15 फेब्रुवारी 2025 रोजी सुयश समूहाला व आदिशक्ती समूहाला 15 लाख 72,000 हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. व्यवसाय करण्यासाठी बँक कर्ज च्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम केले जाते .
यावेळी.सय्यद फिरोज, गौरव मकासरे , रावसाहेब भोरे , दीपक अवंतकर , दिनेश काशीद,शुभम म्हस्के, दीपक लोंढे, रूपाली झारगड मॅडम व बँकेचे सहाय्यक ऋषिकेश काळे , भरत सोनवणे ,बँक मॅनेजर रमाकांत कांबळे , गजानन गारखेडे ,सीआरपी परविन नजीर शेख आदिंसह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.